यष्टीपाठी धनश्रीची चमकदार कामगिरी

यष्टीपाठी एक झेल आणि तीन फलंदाज यष्टीचीत करत राजावडी क्रिकेट क्लबच्या विजयात दिले मोलाचे योगदान

ठाणे : फलंदाजानी रचलेल्या विजयाच्या पायावर उजयचा कळस चढवताना धनश्री वाघमारेने यष्टीपाठी एक झेल आणि तीन फलंदाज यष्टीचीत करत मुंबई क्रिकेट संघटनेच्या पहिल्या महिला लीग क्रिकेट स्पर्धेत राजावडी क्रिकेट क्लबच्या २५१ धावांच्या विजयात मोलाचे योगदान दिले. राजावडी क्रिकेट क्लबने २० षटकात २ बाद ३२६ धावा केल्या. त्यानंतर प्रतिस्पर्धी प्रभू जॉली यंग क्रिकेटर क्लबला अवघ्या ७५ धावांत गुंडाळून मोठा विजय साकारला.
क्षमा पाटकरची नाबाद १६१ धावांची दिड शतकी खेळी, वृषाली भगतच्या ५२ धावा आणि निविया आंबरेच्या ४० धावांच्या खेळीमुळे राजावडी क्रिकेट क्लबने ३२६ धावांचे मोठे आव्हान उभे केले. या आव्हानाचा पाठलाग करताना प्रभू जॉली यंग क्रिकेटर संघाला फक्त ७५ धावा करता आल्या. त्यांची अनुष्का मिश्रा सर्वाधिक ३१ धावा करणारी फलंदाज ठरली. धनश्री यष्टीपाठी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडताना एक झेल आणि तीन यष्टीचीत करत चार विकेट्स मिळवणाऱ्या निविया आंबरेला चांगली साथ दिली.

 32,880 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.