मराठी ग्रंथसंग्रहालय,ठाणे आणि यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या, ठाणे जिल्हा केंद्रातर्फे यशवंतराव चव्हाणांच्या ११० जयंतीनिमित्त आयोजित केला आहे कार्यक्रम.
ठाणे : मराठी ग्रंथसंग्रहालय,ठाणे आणि यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या, ठाणे जिल्हा केंद्रातर्फे दरवर्षी १२ मार्चला यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम सादर करण्यात येतो.यावर्षीही यशवंतराव चव्हाणांच्या ११० व्या जयंतीनिमित्त त्यांनी वेणूताईंना लिहिलेल्या पत्रांचे अभिवाचन डॉ.वसुधा सहस्त्रबुध्दे आणि मकरंद सावंत हे करणार आहेत. यशवंतरावांना साहित्याची उत्तम जाण होती व ते उत्तम साहित्यिकही होते. यशवंतराव कामानिमित्त अनेक ठिकाणी गेले. तेथील संस्कृती,माणसं,निसर्ग ,भौगोलिक परिस्थिती इत्यादीबद्दल त्यानी वेणूताईंशी पत्रातून केलेला संवाद वाचनीय आहे.या पत्रातून त्यांचं आपल्या कुटुंबावरील प्रेम, कर्तव्य आणि त्याचबरोबर त्यांची देशनिष्ठा,समर्पण स्पष्ट होतं. हा कार्यक्रम मराठी ग्रंथ संग्रहालय,तिसरा मजला,गोखले पथ, नौपाडा, ठाणे(पश्चिम) येथील सभागृहात सायंकाळी ५.३०वाजता घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटर ठाणे जिल्हा केंद्राचे अध्यक्ष मुरलीधर नाले तसेच मराठी ग्रंथ संग्रहलायचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी केले आहे.
16,916 total views, 1 views today