गुलमोहरचे झाड ०५ गाड्यांवर पडल्याने नुकसान…!

ठाणे: श्रीरंग सोसायटी परिसरात रोड जवळ पार्क केलेल्या ०५ चारचाकी वाहनांवरती गुलमोहरचे मोठे झाड पडल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास समोर आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी,
चारचाकी वाहनांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
श्रीरंग सोसायटी परिसरात रोड जवळ पार्क केलेल्या ०५ चारचाकी वाहनांवर गुलमोहराचे मोठे झाड पडल्याची माहिती अमित जयस्वाल नामक व्यक्तीने ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानुसार, घटनास्थळी वृक्षप्राधिकरण विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. त्यांनी तातडीने चारचाकी वाहनावरती पडलेले झाड कापून बाजूला करण्यात आले असून या घटनेत कोणालाही दुखापत नाही. तर ज्या चारचाकी वाहनांवरती झाड पडले. त्या चारचाकी वाहनांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

 338,810 total views,  1,110 views today

Leave a Reply

Your email address will not be published.