श्री गुरु गोविंद सिंघ जी स्टेडियमच्या आधुनिकीकरणासाठी 442 कोटी ची मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी
केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मंडाविया यांना केली.
महाराष्ट्र राज्यातील नांदेड शहरात असलेल्या श्री गुरु गोविंद सिंघ जी स्टेडियमच्या क्षमता विस्तारासाठी आणि आधुनिकीकरणासाठी 442 कोटी ची मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मंडाविया यांच्या कडे केली.
नांदेड शहर हे श्री गुरु गोविंद सिंघ जी यांची पावन नगरी आहे. शहरातील क्रीडाभावना वाढविण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेने श्री गुरु गोविंद सिंघ जी स्टेडियमचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
हे स्टेडियम स्थानिक क्रीडा प्रतिभेला तर प्रोत्साहन देईलच पण प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांसाठी देखील योग्य पायाभूत सुविधाही उपलब्ध करून देईल.
ज्यामुळे परिसरातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतील.
आणि प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा पटुंना उत्तम क्रीडा मंच म्हणून देशात हे स्टेडियम लोकप्रिय होईल असा विश्वास खा. डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केला.

57 total views, 3 views today