पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प हा इतिहास घडविणारा ठरला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सलग तिसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करून नवा विक्रम प्रस्थापित केला. तसेच या अर्थसंकल्पातून देशभरातील युवक, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्यांचा विचार करण्यात आला.
देशातील ४ कोटी १० लाख तरुणांना पाच वर्षांत रोजगार, `इपीएफओ’मध्ये पहिल्यांदा नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना ३ हप्त्यांमध्ये १५ हजारांपर्यंतचा पगार, कौशल्य विकास शिक्षणातून २० लाख तरुण कुशल, तरुणांना साडेसात लाखांपर्यंत कर्ज, उच्च शिक्षणासाठी १० लाखांपर्यतचे कर्ज, नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल व बालसंगोपन शिशू गृह, नैसर्गिक शेतीसाठी १ कोटी शेतकऱ्यांना प्रोत्साहन व शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात तब्बल १ लाख ५२ हजार कोटींची तरतूद ही अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहे. मध्यमवर्गीयांना सुमारे ३ लाख रुपयांचे उत्पन्न करपात्र होणार असल्यामुळे दिलासा मिळेल. तर ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेद्वारे पालकांना त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या शिक्षणाची आणि वृद्धापळात त्यांच्या पेन्शनची सोय करता येणार आहे. सर्व समाजघटकांचा विचार करून देशाला विकसित भारताकडे वेगाने नेणारा हा अर्थसंकल्प असेल
निरंजन डावखरे,
आमदार,
भाजपा
886 total views, 1 views today