व्हॉलीबॉल स्पर्धेद्वारे देणार दिवंगत मित्राला मानवंदना

आपल्या मित्राच्या स्मरणार्थ खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा आर्थिक भार त्याचे सगळे इतर मित्र उचलणार आहेत.

ठाणे : आपल्या दिवंगत स्नेह्याची आठवण ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केल्याचे नेहमी पहायला मिळते. असाच एक एक उपक्रम येत्या शनिवार व रविवार असे दोन दिवस ठाणे पूर्व भागातील धर्मवीर क्रीडा संकुलात रंगणार आहे. मस्टागं व्हॉलीबॉल क्लब ठाणे जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या माध्यमातून आपला सहकारी खेळाडू धवल अहेर याला आगळीवेगळी मानवंदना देणार आहे.
अव्वल दर्जाचा व्हॉलीबॉलपटू असलेल्या धवलचे ऐन उमेदीत अपघाती निधन झाले होते. त्याच्याप्रति असणाऱ्या स्नेहापोटी आयोजित या दोन दिवसीय व्हॉलीबॉल स्पर्धेत जिल्ह्यातील आघाडीच्या आठ संघांना प्रवेश देण्यात येणार असून या संघाकडून कुठलीही प्रवेश फी घेतली जाणार नाही. स्पर्धेतील सर्व सामने साखळी पद्धतीने खेळवण्यात येतील. आपल्या मित्राच्या स्मरणार्थ खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा आर्थिक भार त्याचे सगळे इतर मित्र उचलणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने चांगले जूने कपडे दान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले असून हे कपडे गरजू लोकांपर्यत पोहचवले जाणार आहेत.

 4,208 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.