भारतीय पोर्टस् क्षेत्रातील पाच हॉकी संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेला मुंबई हॉकी संघटनेच्या हॉकी स्टेडियमवर दणदणीत सुरूवात झाली.
मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित अखिल भारतीय मेजर पोर्टस् हॉकी स्पर्धेत यजमान मुंबई पोर्टने चेन्नई पोर्ट संघाचा ९-२ तर कोलकाता पोर्टने विशाखापट्टणम पोर्टचा १४-०ने धुव्वा उडवला.
भारतीय पोर्टस् क्षेत्रातील पाच हॉकी संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेला मुंबई हॉकी संघटनेच्या हॉकी स्टेडियमवर दणदणीत सुरूवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन १९७५ सालच्या हॉकी वर्ल्डकपच्या जगज्जेत्त्या संघाचे प्रतिनिधीत्व करणारे ओंकार सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुंबई पोर्टस् हॉकी संघटनेचे सरचिटणीस ़यू आर मोहनराजू आणि संयोजन सरचिटणीस पी. सी. प्रजापती हे उपस्थित होते. पाच संघांमध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जात असून स्पर्धेतला अव्वल संघ विजेता ठरेल.
428 total views, 2 views today