बाळू एकादश ६ धावांनी विजयी

तेजस्वी जैस्वालचा (२३) अपवाद वगळता बाळू एकादश संघाच्या आघाडीची फळी धावा उभारण्यात अपयशी ठरली होती. संघ अडचणीत असताना मयुरेश तांडेल (२५) आणि अबुल कलामने २७ धावांची खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली.

मुंबई : कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित मुंबई चॅम्पियनशिप टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत बाळू एकादश संघाने ऍग्री बीड संघाचा सहा धावांनी पराभव करत बाद फेरीत खेळण्यासाठी आपले आव्हान कायम ठेवले. बाळू एकादश संघाच्या ९ बाद १४७ धावांचा पाठलाग करताना ऍग्री बीड संघाला १४१ धावा करता आल्या.
प्रथम फलंदाजी करताना तेजस्वी जैस्वालचा (२३) अपवाद वगळता बाळू एकादश संघाच्या आघाडीची फळी धावा उभारण्यात अपयशी ठरली होती. संघ अडचणीत असताना मयुरेश तांडेल (२५) आणि अबुल कलामने २७ धावांची खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली. सागर मिश्राने २६ धावांत ४ विकेट्स मिळवून प्रतिस्पर्ध्यांना दडपणाखाली आणले होते. तर अख्तर शेख, आलीम शेखने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.
उत्तरादाखल अजित यादवने ४९ आणि सहाद सय्यदने ३५ धावा करत संघाला विजयाची आस दाखवली होती. पण बाळू एकादश संघाच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत फलंदाजांवर वर्चस्व राखत संघाला आवश्यक असा विजय मिळवून दिला. अबुल कलाम, अक्रम शेख आणि शमीत शेट्टीने प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. मयुरेश तांडेल आणि दिपक गायकवाडने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. अबुल कलाम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
संक्षिप्त धावफलक :
बाळू एकादश : २० षटकात ९ बाद १४७ (तेजस्वी जैस्वाल २३, मयुरेश तांडेल २५, अबुल कलाम २७, सागर मिश्रा ४-२६-४, अख्तर शेख ४-२७-२, आलीम शेख ४-१५-२) विजयी विरुद्ध ऍग्री बीड : २० षटकात ८ बाद १४१ ( अजित यादव ४९, सहाद सय्यद ३५, अबुल कलाम ४-२०-२, अक्रम शेख ४-२६-२, शमीत शेट्टी ४-४०-२, मयुरेश तांडेल ४-१३-१, दिपक गायकवाड १-६-१). सामनावीर – अबुल कलाम.

 146 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.