प्रशांत – निलमला अग्र मानांकन

शिवाजी पार्क जिमखाना आयोजित १४ वी राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.

मुंबई : शिवाजी पार्क जिमखान्याच्यावतीने १० फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून जिमखान्याच्या वास्तूत १४ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला सुरुवात होत आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन विभागात खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकंदर ४४५ खेळाडूंनी भाग घेतला असून सारस्वत बँकेचा पुरस्कार या स्पर्धेला लाभला आहे. पुरुष एकेरीत माजी जागतिक विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेला तर महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबईच्या निलम घोडकेला प्रथम मानांकन देण्यात आले आहे.
स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे
पुरुष एकेरी : १) प्रशांत मोरे ( मुंबई ), २) महम्मद घुफ्रान ( मुंबई ), ३) झैद फारुकी ( ठाणे ), ४) पंकज पवार ( मुंबई ), ५) संदीप दिवे ( मुंबई उपनगर ), ६) सिद्धांत वाडवलकर ( मुंबई ), ७) योगेश धोंगडे ( मुंबई ), ८) संदीप देवरुखकर ( मुंबई )
महिला एकेरी : निलम घोडके ( मुंबई ), २) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ), आयेशा खान ( मुंबई ) ४) प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ), ५) काजल कुमारी ( मुंबई ) ६) मिताली पाठक ( मुंबई ), ७) प्रीती खेडेकर ( मुंबई ), ८) समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ).

 293 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.