शारदाश्रम विद्यामंदिरच्या मुली अजिंक्य

ठाण्यातील वसंत विहार हायस्कुलला नमवत शालेय संघटनेची मनोरमाबाई आपटे स्पर्धा जिंकली.
मुंबई : इरा जाधवने ५९ चेंडूंत २० चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी करत ठोकलेल्या तडाखेबंद ११९ धावांच्या खेळीच्या जोरावर शारदाश्रम विद्यामंदिर इंग्लिश माध्यमाच्या मुलींनी ठाण्याच्या वसंत विहार हायस्कूलचा १३८ धावांनी धुव्वा उडवला आणि मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या १६ वर्षाखालील मुलींच्या मनोरमाबाई आपटे क्रिकेट स्पर्धेत बाजी मारली.
मरीन लाइन्स पारसी जिमखान्यावर झालेल्या अंतिम लढतीत शारदाश्रमने इरा जाधव आणि सारथी भाकरे (५६) यांनी दुसर्‍या विकेटसाठी ९७ चेंडूंत केलेल्या १८५ धावांच्या भागीमुळेच २० षटकांत ६ बाद २१० धावा केल्या होत्या. तर २११ धावांचा पाठलाग करणार्‍या वसंत विहारला प्रिशा देवरुखकर (५ धावांत २ विकेट), मुग्धा पार्टे ( ४ धावांत २बळी) आणि मधुरा धडके ( १५ धावांत २ बळी) या तिघींच्या प्रभावी गोलंदाजीने ७२ धावांतच गुंडाळले. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा माजी कसोटीपटू जयंतीलाल केनिया, एमसीएचे अभय हडप आणि शालेय संघटनेचे क्रिकेट सचिव नदीम मेमन यांच्या उपस्थितीत पार पडला.

 303 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.