स्पीडीच्या विजयात सिद्धार्थ म्हात्रे चमकला

सिद्धार्थच्या अर्धशतकामुळे स्पीडी क्रिकेट क्लबने ११ व्या षटकात १०७ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. सिद्धार्थला या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

मुंबई : गोलंदाजानी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पडल्यावर सिद्धार्थ म्हात्रेने तडाखेबंद अर्धशतकी खेळी करत स्पीडी क्रिकेट क्लबला युवा कोकण प्रतिष्ठान आयोजित मुंबई चॅम्पियनशिप टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत दणदणीत विजय मिळवून दिला. प्रथम ऑक्टा स्टार असे वाचावे क्रिकेट क्लबला १०६ धावांत गुंडाळल्यावर सिद्धार्थच्या अर्धशतकामुळे स्पीडी क्रिकेट क्लबने ११ व्या षटकात १०७ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. सिद्धार्थला या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑक्टा स्टार असे वाचावे क्रिकेट क्लबला सुफियान चौहानच्या अर्धशतकामुळे १०६ धावांपर्यंत मजल मारता आली. या शतकी धावसंख्येत सुफियानचा वाटा होता तो ६९ धावांचा.शद्ब खानने ऑक्टा स्टार असे वाचावे क्रिकेट क्लबला मर्यदित धावांवर रोखताना २५ धावांत ३ विकेट्स मिळवल्या.तर अथर्व डाकवे आणि मोनील सोनीने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.स्पीडी क्रिकेट क्लबला मोठा विजय मिळवून देताना सिद्धार्थने म्हात्रेने ३६ चेंडूत १० चौकार आणि एक षटकार ठोकत ५९ धावा केल्या.सिद्धार्थ घागने २१ धावांचे योगदान दिले. सुफियानाने गोलंदाजीतही छाप पाडताना २४ धावांत दोन विकेट्स मिळवल्या.
संक्षिप्त धावफलक :
ऑक्टा स्टार क्रिकेट क्लब : १८.३ षटकात सर्वबाद १०६ ( सुफियान चौहान ६९, शदाब खान ३-२५-३, मोनील सोनी ३.३-२२-२, अथर्व डाकवे ३-१-१५-२, दर्शन ३-१४-२, सिद्धांत सिंग २-१४-१,यश डीचलकर ३-१-११-१) पराभूत विरुद्ध स्पीडी क्रिकेट क्लब : ११ षटकात ३ बाद १०७ ( सिद्धार्थ म्हात्रे ५९, सिद्धार्थ घाग २१, सुफियान चौहान ३-२४-२, अब्दुल आहद सुपारीवाला ४-०-३५-१). सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू – सिद्धार्थ म्हात्रे

 174 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.