भारतरत्न स्वर कोकिळा लतादीदींना ७० हून अधिक गायक देणार मानवंदना

सूर सुदान शौर्या स्वर संस्था ठाणे च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रम

ठाणे : जोवर चंद्र-सूर्याचं अस्तित्व ह्या भूतलावर आहे तोवर ज्यांचा आवाजाचे गारुड प्रत्येक कांनसेनावर कायम राहणार व साऱ्या विश्वावर आपल्या आवाजाची किमया आजतागायत पसरवलेल्या भारतरत्न स्वर कोकिळा लता मंगेशकर ह्यांना त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या दिवशी सूर सुदान शौर्या स्वर संस्थेच्या ७० हून अधिक गायक व गायिका सोमवार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते रात्रौ १० वाजेपर्यंत सलग १२ तास लतादीदींनी गायलेली सर्व भाषेतील गाणी निवडून १११ हून अधिक गाणी गाऊन मानवंदना देणार आहेत.
ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालय, पहिला मजला, मार्केट रोड, ठाणे पश्चिम येथे होणार आहे. प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य ठेवण्यात आला आहे, त्याचा लाभ सर्व लतादीदींच्या चाहत्यांनी घ्यावा अशी विनंती व माहिती संस्थेचे अध्यक्ष सागर जोशी ह्यांनी दिली आहे. अधिक माहिती साठी ९९२०७८१७०० या क्रमांकावर संपर्क साधावा.

 6,068 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.