डोंबिवली क्रिकेट क्लब उपांत्य फेरीत

विशाल पुढारीने तडाखेबंद नाबाद ५४ धावांची अर्धशतकी खेळी करत १८ व्या षटकातच ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १७४ धावसंख्येसह उपांत्य फेरीतील आपल्या संघाचे स्थान निश्चित केले. याआधी विशालने दुसऱ्या फेरीच्या लढतीत धुरु क्रिकेट क्लबविरुद्धच्या सामन्यात ५२ धावा केल्या होत्या.
ठाणे : सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या विशाल पुढारीच्या सलग दुसऱ्या अर्धशतकाच्या जोरावर डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनने भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशनचा सात विकेट्सनी पराभव करत स्पोर्टिंग क्लब कमिटी आयोजित ६६ व्या शामराव ठोसर ढाल एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
सेंट्रल मैदानात खेळल्या गेलेल्या सामन्यात कर्णधार विजय इंदपने टॉस जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवताना भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशन संघाला १७० धावांत रोखले. पृथ्वी गोवारीने ३० धावांत ३ विकेट्स मिळवल्या. तर कर्णधार विजय इंदपसह प्रतीक जैस्वाल आणि मृगेन कोळीने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
त्यानंतर विशाल पुढारीने तडाखेबंद नाबाद ५४ धावांची अर्धशतकी खेळी करत १८ व्या षटकातच ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १७४ धावसंख्येसह उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. याआधी विशालने दुसऱ्या फेरीच्या लढतीत धुरु क्रिकेट क्लबविरुद्धच्या सामन्यात ५२ धावा केल्या होत्या. संघाच्या मोठया विजयात अश्विन माळीने ४६ आणि श्रेयस लाडने ४१ धावांचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक :
भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशन : ३५ षटकात सर्वबाद १७० ( अजय जैस्वाल ६३, अमजद शेख २०, सत्यम खानविलकर १८, पृथ्वी गोवारी ७-३०-३, प्रतीक जैस्वाल ५-१-१४-२, मृगेन कोळी ४-१४-२, विजय इंदप ८-३५-२) पराभुत विरुद्ध डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशन : १७.४ षटकात ३ बाद १७४ ( विशाल पुढारी नाबाद ५४, अश्विन माळी ४६, श्रेयस लाड ४१, अमजद शेख ५-१-२०-१, अजय जैस्वाल ६-१-२६-१, शिवम गुप्ता ४.५-३४-१).

 1,311 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.