प्रजासत्ताक दिनानिमित्त
चला मुलांनो खेळूया आणि ऑलोम्पिक पदक मिळवूया संकल्पनेवर आधारित चित्ररथ

यावर्षीची संकल्पना, रेखाचित्रे व त्रिमितीय प्रतिकृती निलेश कुलकर्णी या मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केली आहे.

मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदान येथे दरवर्षी पथसंचलन होते. त्यासाठी विविध शासकीय विभागाकडून आणि महामंडळ कडून चित्ररथ सहभागी होतात. मागील दोन वर्षी कोरोना मुळे पथसंचलनात सहभाग झाला नव्हता .  महाराष्ट्र राज्यातील विविध विभागांची माहिती व लोकहितासाठी निर्णय यांची  दर्शन घडवणारा हा रथ बनवतात. 
यावर्षी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने चित्ररथासाठी चला मुलांनो खेळूया आणि ऑलोम्पिक पदक मिळवूया' या संकल्पनेची निवड करण्यात आली आहे. मुलांनी जास्तीत जास्त खेळात सहभागी व्हावे व आपली शाररीक क्षमता वाढीसाठी योग्य प्रयत्न केले पाहिजेत. पालकांचा खंबीर पाठिंबा, उच्च दर्जाचे क्रीडा मार्गदर्शक आणि अथक मेहनत घेण्याची तयारी ही खेळाडूची  बलस्थाने आहेत. आदरणीय खाशाबा जाधव यांनी भारताला मिळवून दिलेले पहिले पदक ते नीरज चोप्रा यांच्यापर्यंतचा ऑलिम्पिक पदकाचा प्रवास आम्हास अचंबित करतो ! महाराष्ट्र शासन उदयोन्मुख खेळाडूंच्या सदैव पाठीशी आहे ! कुस्ती , कब्बडी , खो-खो , भालाफेक , बेडमेंटन तसेच इतर खेळ याची  माहिती मुला-मुलींना सहभागी होण्यासाठी प्रोह्स्ताहित करतात.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या उप संचालिका स्नेहल साळुंके , तसेच वरिष्ठ अधिकारी चेतन चव्हाण , धुमाळ सर यांच्या विशेष सहकार्याने हा चित्ररथ तयार झाला आहे .यावर्षीची संकल्पना, रेखाचित्रे व त्रिमितीय प्रतिकृती निलेश कुलकर्णी या मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केली आहे. त्यांच्यासोबत 'सिद्धी एड'चे संचालक देवेंद्र कुलकर्णी यांनी या प्रतिकृतीचे काम सांभाळले आहे. २२ जणांचा समावेश असलेल्या, मूर्तिकार आणि कलाकारांच्या टीमला घेऊन राहुल धनसरे मेहनत घेऊन २६ जानेवारीपर्यंत महाराष्ट्राचा चित्ररथ परिपूर्ण करण्याचे काम केले आहे.

 143 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.