मुंडे स्पोर्ट्सचा दणदणीत विजय

पुष्कराज चव्हाणच्या चार विकेट्स आणि जय बिष्टाच्या ४९ धावांमुळे मुंडे स्पोर्ट्सने माहीम दर्गा क्रिकेट क्लबचा आठ विकेट्सनी मोठा पराभव केला.

मुंबई : मुंडे स्पोर्टसने सलग दुसऱ्या मोठया विजयासह कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित मुंबई चॅम्पियनशिप टी २० लीग क्रिकेट स्पर्धेतील आपली विजयी आगेकूच कायम ठेवली. पुष्कराज चव्हाणच्या चार विकेट्स आणि जय बिष्टाच्या ४९ धावांमुळे मुंडे स्पोर्ट्सने माहीम दर्गा क्रिकेट क्लबचा आठ विकेट्सनी दणदणीत पराभव केला. माहीम दर्गा क्रिकेट क्लबला ९० धावांमध्ये गुंडाळल्यावर मुंडे स्पोर्ट्सने ९.४ षटकात ९१ धावा करत विजयाचे लक्ष्य पार केले.
अर्षद शेख (३४), रिझवान शेख ( २२) आणि नाविद इक्बालने १२ धावा केल्यामुळे माहीम दर्गा क्रिकेट क्लबला ९० धावापर्यंत मजल मारता आली. पुष्कराज चव्हाणने २२ धावांत चार विकेट्स मिळवत प्रतिस्पर्ध्यांना जखडून ठेवले. भव्य अत्रेने दोन, वसंत मुंडे, अक्षय पाटील आणि नूतन गोयलने प्रत्येकी एक विकेट मिळवली. त्यानंतर जय बिष्टाने ४९ आणि परिक्षित वळसंगकरने २५ धावांचे योगदान देत डावातील १० व्या षटकात संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. समीर अंसारी आणि झैद खत्रीने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
संक्षिप्त धावफलक – माहीम दर्गा क्रिकेट क्लब : १५.४ षटकात सर्वबाद ९० ( अर्षद शेख ३४, रिझवान शेख २२, नाविद इक्बाल १३, पुष्कराज चव्हाण ४-२२-४, भव्य अत्रे ३-२१-२, वसंत मुंडे २-१३-१, अक्षय पाटील ०.४-३-१, नूतन गोयल २-१३-१) पराभूत विरुद्ध मुंडे स्पोर्ट्स : ९.४षटकात २ बाद ९१ (जय बिष्टा ४९, परिक्षित वळसंगकर २५, समीर अंसारी ३-१८-१, झैद खत्री २-२९-१) मुंडे स्पोर्ट्स ८ विकेट्स राखून विजयी. सामनावीर – पुष्कराज चव्हाण.

 163 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.