वाशी रुग्णालयातील कर्मचारी समस्या सोडविण्यासाठी इंटकची धडक

पालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात वॉर्ड बॉय (कक्षेवक), आया यांची संख्या कमी आहे. काही आया व ववॉर्ड बॉय यांचे निधन झाले आहे, काही सेवानिवृत्त झाले आहेत. अनेक जण सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे रुग्णालयात संख्याबळ कमी असल्याने कर्मचारी संख्येवर ताण पडत आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी कर्मचाऱ्यांसोबत रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत जवादे यांच्या दालनात धडक देत कर्मचारी समस्येचा पाढा वाचला. रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे अपुरे मनुष्यबळ याबाबत पालिका मुख्यालयाला कल्पना दिली असून तिकडून संख्याबळ येताच तात्काळ या समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन डॉ. जंवादे यांनी कामगार नेते रविंद्र सावंत यांना दिले.
पालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात वॉर्ड बॉय (कक्षेवक), आया यांची संख्या कमी आहे. काही आया व वॉर्ड बॉय यांचे निधन झाले आहे, काही सेवानिवृत्त झाले आहेत. अनेक जण सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे रुग्णालयात संख्याबळ कमी असल्याने कर्मचारी संख्येवर ताण पडत आहे. तसेच अन्य काही जण सेवानिवृत्तीच्या जवळ आले आहेत. त्यामुळे रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा व कामावर पडणारा ताण याबाबत रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास समस्येचे गांभीर्य आणून देण्यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी रुग्णालयीन कर्मचारी व महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या रुग्णालयीन युनिट पदाधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत जवांदे यांच्या कार्यालयात धडक देत त्यांच्यासमोर अपुरे कर्मचारीबळ व अन्य समस्यांचा पाढा वाचला.
अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांना हक्काच्या रजा भेटत नाहीत, अतिरिक्त वेळ (ओव्हर टाईम) काम करावे लागत आहे. या कामाचेही प्रशासनाकडून पैसे दिले जात नाहीत. बदली कर्मचारी मिळत नाहीत. पूर्वी कामामध्ये रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना बहूउद्देशीय संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळायचे, पण आता बहूउद्देशीय कर्मचाऱ्यांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. उपलब्ध संख्याबळावर कामाचा ताण वाढल्याने ते आजारी पडण्याचे व चीडचीड होण्याचे प्रमाण वाढीस लागल्याचे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी चर्चेदरम्यान डॉ. जवादे यांच्या निदर्शनास आणून दिले.
या समस्या जाणून घेतल्यावर डॉ. जवादे यांनी अपुऱ्या मनुष्यबळावर पालिका मुख्यालयात कळविण्यात आले असून लवकरच मनुष्यबळ उपलब्ध होवून या समस्येचे निवारण होणार असल्याचे त्यांनी कामगार नेते रविंद्र सावंत व त्यांच्या शिष्टमंडळाला सांगितले.
यावेळी रविंद्र सावंत यांच्या समवेत शिष्टमंडळात वाहन विभागाचे युनिट अध्यक्ष राजेंद्र सुतार , वाशी हॉस्पिटल युनिट पदाधिकारी सुहास म्हात्रे, सुधीर पुत्रन, आनंद शिंदे, राजेंद्र सातपुते, मधुकर झुंझारडे, महिला पदाधिकारी प्रतिभा नाईक, सुनीता दातार, सुनंदा पवार, गुलाब पवार, असू सुसोदीया उपस्थित होते.

 155 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.