कवितांच्या माध्यमातून वडील आणि मुलाच्या नात्यावर टाकलाय प्रकाश
ठाणे : वडील आणि मुलाच्या नात्यावर प्रकाश टाकणाऱ्या डॉ.विवेक बोंडे लिखित आणि अनघा प्रकाशन प्रकाशित ‘ जाणिवांची अक्षरे ‘ या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार २२ जानेवारी रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता हितवर्धिनी सभा,नौपाडा,ठाणे प.(सावरकर वाचनालय-उमा निळकंठ व्यायामशाळा येथे ज्येष्ठ कवी आणि लेखक डॉ.महेश केळुसकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री प्रधान दामले करणार आहेत. काव्यरसिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन अनघा प्रकाशनच्या प्रकाशिका विद्या नाले यांनी केले आहे.
527 total views, 2 views today