लोणावळा येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आली आहे स्पर्धा.

लोणावळा : शिवजयंती उत्सव मित्र मंडळ, खंडाळाच्यावतीने व मछिंद्र बबनराव खराडे यांच्या पुढाकाराने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २७ ते २९ जानेवारी दरम्यान लोणावळा येथील कुमार रिसॉर्ट येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने हि स्पर्धा संपन्न होणार आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये हि स्पर्धा खेळविण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्यांना एकंदर १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके व हिंदू हृदयसम्राट स बाळासाहेब ठाकरे चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. स्पर्धेत नावे नोंदविण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी असून सहभाग घेण्यासाठी खेळाडूंनी आपल्या जिल्हा कॅरम संघटनेशी संपर्क साधावा.

 361 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.