…म्हणून मॉर्निग वॉकला न जाण्याचा डॉक्टरांचा सल्ला


                                                                            थंडीमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढण्याची वैद्यकीय क्षेत्रातून भीती

नवी मुंबई – ठाणे : उत्तरेतील बर्फवृष्टी, उत्तर आणि वायव्य दिशेदरम्यान येणारे वारे याच्या परिणामामुळे कोकणासह ठाणे मुंबई रायगड येथे थंडीत वाढ होणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस विविध भागात दाट धुके राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये फक्त ५ दिवसांत हार्ट अटॅकमुळे शेकडो बळी गेले आहेत. तर काही जण जीवनमृत्यूशी झुंज देत आहेत कडाक्याच्या  थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावत असल्यास हृदयाला होणारा रक्ताचा पुरवठा विस्कळित होतो. तसेच, सकाळी लवकर केला जाणारा व्यायाम, शारीरिक हालचालींमुळे हृदयावर ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे हृदयविकाराच्या पेशंटने थंडीत पहाटे व्यायाम अथवा शारीरिक हालचाली करू नये, असा सल्ला हृदयविकार तज्ज्ञांनी दिला आहे. याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे हृदयविकारतज्ञ डॉ. तमिरुद्दीन दानवडे सांगतात, ” थंडीमध्ये हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक असतो हिवाळ्यात तापमानात घट झाल्यानं शरीर संतुलन बिघडतं. यामुळे शरीरावरील अनावश्यक ताण वाढतो. जेव्हा शरीरावरचा अनावश्यक ताण वाढतो आणि भीती निर्माण होते तेव्हा कॅटेकोलामाइन्स शरीराला अशा परिस्थितीशी लढण्यासाठी तयार करतात. ऍड्रिनल  ग्रंथी तणावाच्या स्थितीला तोंड देण्यासाठी पुरेशा प्रमाणात कॅटेकोलामाइन्स तयार करतात. जेव्हा शरीरात कॅटेकोलामाइन्सचं प्रमाण वाढतं तेव्हा हार्ट रेट, ब्लड प्रेशर आणि श्वासाची गती वाढते. त्यामुळे हिवाळ्यात हार्ट अटॅक  किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.”
मुंबईच्या गर्दीपासून दूर तसेच प्लांनिंग सिटी म्हणजेच नियोजित शहराचा सन्मान मिळविलेल्या नवी मुंबई शहराला सर्वात जास्त प्रदूषणाचा फटका बसता असून गेल्या दहा दिवसात शहरातील वाढत्या धूलिकणांमुळे व वाहनांच्या प्रदूषणामुळे अनेक नागरिकांना श्वसनविकारांची लागण होत असून हृदयविकार वाढवण्यासाठी हे प्रदूषण कारणीभूत ठरत आहे. याविषयी अधिक माहिती देताना नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले,” वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाशी संबंधित आजाराचा धोका वाढतो. परंतु, त्यामुळे हृदयविकार होऊ शकतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनने केलेल्या संशोधनानुसार, वायुप्रदूषणामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात. यामुळे काही जणांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. ज्यांना हृदयविकार आहे, त्यांची प्रकृती आणखी बिघडू शकते. हिवाळ्यात अनेकांचा आहार अचानक वाढतो. दिवस लहान असल्याने लोक फिरणं टाळतात. व्यायामाचे प्रमाण कमी होतं. एकूणच शारीरिक हालचाली कमी होतात. यामुळे कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर वाढू लागतं. काही जणांचं वजनदेखील वाढू लाग ते त्यामुळे परिणामी हृदयावरचा दबाव वाढतो आणि त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.”

 6,420 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.