भाजपाचा लबाडपणा उघड ?
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक कार्टून व्हॉट्सअॅपवरून पाठविल्यामुळे शिवसैनिकांनी मारहाण प्रकरण केलेले मदन शर्मा हे संरक्षण विभागाच्या नेव्ही अर्थात नौदलातील अधिकारी नव्हे मर्चंट नेव्ही अर्थात मालवाहतूक जहाजावरील अधिकारी असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे केवळ राजकारणासाठी मालवाहतूक जहाजावरील व्यक्तीला सैन्य दलातील असल्याचे सांगून राजकिय दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे भाजपाचा लबाडपणा उघड झाला आहे.
मदन शर्मा यांचा फेसबुक प्रोफाईल सापडला असून त्यांच्या प्रोफाईलवर मर्चट नेव्ही असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या दाव्यातील फोलपणा उघडकीस आला आहे. तसेच मर्चंट नेव्ही मध्ये असलेल्या व्यक्तीला सैन्य दलातील इंडियन नेव्हीमधला अधिकारी असल्याचे सांगत प्रसारमाध्यमे आणि जनतेची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे.
समाजमाध्यमांवर मदन शर्मा यांची काही माहिती मिळते का याचा शोध घेण्याचा प्रयत्न मराठी ई-बातम्या.कॉमकडून प्रयत्न केला असता ही माहिती हाती मिळाली. एखाद्या कारणावरून कायदा स्वत:च्या हातात घेवून कोणालाही मारहाण करणे हे चुकच आहे. त्यामुळे त्याचे समर्थन करता येत नाही
553 total views, 3 views today