किन्हवलीत कारच्या टायरची चोरी

गाडीच्या मागील भागातील दोन्ही टायर चोरटे गेले घेऊन

शहापुर : किन्हवली येथील गुरुकुलनगरच्या मोरया अपार्टमेंट मध्ये राहणारे सुनील केदार यांच्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच ०४ / एफ आर २९३८ या गाडीचे मागील भागाचे दोन्ही टायर अज्ञात चोरट्यांनी काढून नेले असून गुरुकुल नगर मधील वर्षभरातील अशाच प्रकारची हि दुसरी घटना आहे.
किन्हवली येथे पोलीस भरती पूर्वप्रशिक्षण देणाऱ्या संघर्ष पोलीस अकाडमीचे प्रशिक्षक सुनील केदार यांच्याकडील त्यांच्या राजेश या भावाच्या नावे असलेली स्विफ्ट डिझायर हि कार ते राहत असलेल्या गुरुकुल नगरातील मोरया अपार्टमेंटच्या मोकळ्या जागेत उभी करून ठेवली होती.
काल(दि.१२)सकाळी ते गाडी काढण्यासाठी खाली उतरले असता गाडीच्या मागील भागाचे दोन्ही टायर रिंगसह काढून नेल्याचे दिसताच त्यांना धक्काच बसला.शहापूर -सरळगाव या मुख्य रस्त्याच्या अगदी काही फूट अंतरावर उभी असलेल्या गाडीचे टायर चोरी झाले असून याच परिसरात साधारण गेल्यावर्षी सुद्धा किशोर मोंडूळा यांच्या स्विफ्ट गाडीचे चारही टायर चोरीला गेले होते,त्याचा किन्हवली पोलिसांना अजूनही तपास लागला नसताना हि दुसरी घटना घडली असल्याने वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

 580 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.