कोळी समाजाचे नेते पंढरीनाथ पाटील यांचे निधन

क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, वारकरी संप्रदाय अशा सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी होती केली

कल्याण : कल्याण मधील कोळी समाजाचे जेष्ठ नेते, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, वारकरी संप्रदाय अशा सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे महाराष्ट्र कोळी समाजाचे उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे माजी सचिव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य, कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, आगरी-कोळी समाजाचे मार्गदर्शक पंढरीनाथ तुकाराम पाटील (७२)यांचे आज निधन झाले. पाटील यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर कल्याण मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, २ भाऊ, ३ मुलं, ३ मुली असा परिवार आहे.  त्यांच्या निधनाने कल्याण मधील सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी हळहळ व्यक्त केली आहे.  

 346 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.