ठाणे जिल्ह्यात गुरुवारी एक हजार ८५६ रुग्णांची तर, ३२ जणांचा मृत्यूची नोंद
ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी हि जिल्ह्यात एक हजार ८५६ रुग्णांसह ३२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या एक लाख ४० हजार २४९ तर, मृतांची संख्या आता तीन हजार ८४३ झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली सर्वाधिक महापालिकेत ५९१ रुग्णांसह ९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या ३३ हजार ५२० तर, मृतांची संख्या ७०९ वर गेली आहे ठाणे महानगर पालिका हद्दीत ४०३ बाधितांची तर, ६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या २९ हजार ८४ तर, मृतांची संख्या ८८० वर गेली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३९० रुग्णांची तर, ७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या २९ हजार ५५५ तर, मृतांची संख्या ६४७ वर पोहोचली आहे. मीरा भाईंदरमध्ये २२१ रुग्णांची तर, ४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या १४ हजार ५९६ तर, मृतांची संख्या ४६० इतकी झाली आहे. तर, भिवंडी महापालिका क्षेत्रात १५ बधीतांचीतर,एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ४ हजार ४०९ तर,मृतांची संख्या २९४ झाली. तसेच उल्हासनगर २० रुग्णांची तर, २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ८ हजार १४३ तर, मृतांची संख्या २४५ झाली आहे. अंबरनाथमध्ये २१ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ५ हजार ३५४ झाली. तर, बदलापूरमध्ये ६२ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ४ हजार ७४६ इतकी झाली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात १३३ रुग्णांची तर, ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या १० हजार ८४२ तर, मृतांची संख्या ३३४ वर गेली आहे.
467 total views, 1 views today