जेष्ठ पत्रकार प्रशांत कांबळी यांचे निधन

सुरवातीच्या काळात त्यांनी साप्ताहिक वृत्तपत्र सुरू करून पत्रकारितेला सुरुवात केली. त्या नंतर ठाणे प्रतिष्ठा या लोकप्रिय वृत्तवाहिनीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये आपला ठसा उमठवला होता.

ठाणे : ठाणे शहर दैनिक पत्रकार संघांचे सहचिटणीस आणि ठाणे टाईम्स या दैनिकाचे संपादक जेष्ठ पत्रकार प्रशांत कांबळी यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर ठाण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
ठाणे टाईम्स या वर्तमानपत्राचे संपादक असलेले प्रशांत कांबळी यांना बुधवारी सायंकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सूरू असताना गुरुवारी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल ठाण्यातील राजकीय सामाजीक क्षेत्रातून दुःख व्यक्त करण्यात येतं आहें. मृत्यूसमयी त्यांचं वय ५७ होतं. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहें. गेल्या २०वर्षाहुन अधिक काळ त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम केले. सुरवातीच्या काळात त्यांनी साप्ताहिक वृत्तपत्र सुरू करून पत्रकारितेला सुरुवात केली. त्या नंतर ठाणे प्रतिष्ठा या लोकप्रिय वृत्तवाहिनीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये आपला ठसा उमठावला, ठाणे टाईम्स वृत्तपत्राच्या माध्यमातून देखील त्यांनी , दररोजच्या घडामोडी तसेच आर्थिक, दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघांचे ते विद्यमान सहचिटणीस होते. त्यांच्या निधनाने ठाणे शहर दैनिक पत्रकार संघांचे मोठे नुकसान झाले असून कांबळी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी असल्याची प्रतिक्रिया ठाणे शहर दैनिक पत्रकार संघांचे अध्यक्ष राजेश मोरे यांनी व्यक्त केली आहें.तर प्रशांत कांबळी यांच्या अकाली निधनाने एक चांगला सहकारी गमावला असल्याची प्रतिक्रिया ठाणे जिल्हा पत्रकार संघांचे अध्यक्ष संजय पितळे यांनी व्यक्त केली.

 361 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.