कोव्हीड लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना केले होते विविध पातळीवर सहकार्य
ठाणे : कोव्हीड लॉकडाऊनच्या काळात सहकार्याचा हात देत पोलिसांना शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात मदत करणाऱ्या जतीन शहा यांना ठाणे पोलिसांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे. लॉकडाऊनमध्ये आपल्या गावी परतणाऱ्या परप्रांतीय नागरिकांकडून कोरोना चाचणी करण्यासाठी वारेमाप पैसे घेतले जात होते. त्यावेळी शहा यांनी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली अश्या नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय चाचणीची व्यवस्था केली होती. नंतरच्या काळातही शहा यांनी पोलिसांच्या सूचनेनुसार विविध ठीकाणी मदत केली होती. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
485 total views, 1 views today