अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा विद्यार्थी भारतीचा इशारा
कल्याण : मध्यप्रदेश, बनारस हिंदू युनिवर्सिटी, दिल्ली, छत्तिसगढ, कोलकत्ता, पंजाबने सुद्धा वापरलेली होम असाईनमेंट किंवा ओपन बुक पद्धतच महाराष्ट्रात सगळ्या युनिवर्सिटीनी वापरली पाहीजे. एमसीक्यू प्राॅक्टर्ड पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांना नापास होऊन वर्ष वाया जाण्याची भिती आहे. असे असतांना अंतिम सत्राच्या परीक्षा असाईन्टमेंट घेतल्या जाव्यात अन्यथा विद्यार्थी भारती मुंबई विद्यापीठावर(कलिना) तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिला आहे.
अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्वरूपात बद्दल न करता होम असाईटमेंट किव्हा ओपन बुक परीक्षा घेण्यात याव्या, विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस किती परीक्षेला सामोरे जायचे, अंतिम सत्र, CET , ATKT अशा किती प्रकारच्या परीक्षांना सामोरे जायचे असा सवाल विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी विचारला आहे.
438 total views, 1 views today