अनेक कार्यकर्त्यांचा रिपाइ एकतावादीमध्ये प्रवेश
ठाणे : ठाणे शहरात रिपाइं (आ) ला मोठे खिंडार पडले आहे. रिपाइं आठवले गटाचे सरचिटणीस मंगेश सादरे यांच्यासह शेकडो पदाधिकार्यांनी रिपाइ एकतावादीमध्ये जाहीर प्रवेश केला. युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी या सर्वांना पक्षप्रवेश दिला.
मंगेश सादरे हे काही वर्षांपूर्वी रिपाइं एकतावादीतून रिपाइं आठवले गटात गेले होते. मात्र , आठवले गटात कामाचे चीज होत नसल्याने तसेच अंतर्गत कलहामुळे या पक्षाची ठाण्यात पुरती वाताहत झाली आहे. त्यामुळे शेकडो पदाधिकार्यांनी रिपाइ एकतावादीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, असे सांगितले. तसेच, पक्षप्रवेश करणारे मंगेश सादरे यांची ठाणे शहर युवाध्यक्ष, सुरेश मोरे यांची वागळे विभाग अध्यक्ष, बाळाजी नारायणकर यांची, वागळे विभाग सचिव, उपेंद्र गैड यांची वागळे विभाग उप.अध्यक्ष, संतनु सुर्यवंशी यांची सावरकर नगर वाॅर्ड अध्यक्ष, कृष्णा कोळे वाड़ अध्यक्ष अंबिका नगर.हीरा पाल यांची वाॅर्ड अध्यक्ष,राम नगर, सचिन करकेरा वाॅर्ड सचिव सावरकर नगर, गोविंदा मोहन यांची वाॅर्ड अध्यक्ष सावरकर नगर या पदांवर नियुक्ती केली.
या पक्ष प्रवेशानंतर मंगेश सादरे यांनी, रिपाइं एकतावादीमध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो. तसेच, भैय्यासाहेब इंदिसे हे सामाजिक समतोल राखून काम करीत आहेत. सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी त्यांचे नेतृत्व प्रेरक ठरत असल्याचे कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. त्यामुळे आम्ही एकतावादीचे युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला आहे, असे सांगितले.
502 total views, 2 views today