ठाकरे सरकार पावसाळी अधिवेशनात हे अध्यादेश आणि विधेयके मंजूर करणार

९ अध्यादेश आणि १२ विधेयके मंजूरीसाठी विधिमंडळात ठेवणार

मुंबई : राज्य विधिमंडळाचे तिसरे अधिवेशनास उद्या सोमवारपासून सुरु होत असून या पावसाळी अधिवेशनात ९ अध्यादेश आणि १२ विधेयके मांडण्यात येणार आहेत. यातील बहुतांष अध्यादेश हे महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणूका कोरोनामुळे पुढे ढकलण्यासांदर्भात आहेत. तर विद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रम, जीएसटी आदींसंदर्भातील काही अध्यादेश मांडण्यात येणार आहेत. याशिवाय राज्यातील जनतेच्या अनुषंगाने १२ नवी विधेयके मांडण्यात येणार आहेत. तत्पुर्वी अर्थसंकल्पातील तरतूदींच्या खर्चाच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या सादर करून त्या मान्य करण्यात येणार आहे.

अध्यादेश खालीलप्रमाणे

महाराष्ट्र महानगरपालिकांच्या (राज्यामध्ये कोरोना कोव्हिड विषाणूच्या सार्वत्रिक महामारीच्या साथीचा प्रसार झाल्यामुळे काही महानगरपालिकांच्या महापौरांच्या व उप महापौरांच्या) निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलणे अध्यादेश, २०२०, (नगर विकास विभाग).
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अध्यादेश, २०२०,  (वित्त विभाग), (वस्तू व सेवा कर परिषदेच्या शिफारशीवरुन, दैवी आपत्तीमुळे ज्या कारवाया पूर्ण केल्या जाऊ  शकत नाही किंवा त्यांचे अनुपालन केले जाऊ  शकत नाही अशा करवायांच्या संबंधातील मुदत मर्यादा परिषदेच्या शिफारशींवरून, अधिसूचनेद्वारे वाढविता येईल शासनास अधिकार, अशी तरतुद करणे)
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०२०, (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (नवीन महाविद्यालय तसेच नवीन अभ्यास पाठ्यक्रम इत्यादी सुरू करण्यासाठी मान्यता देण्याकरिता नियत करण्यात आलेला दिनांक, सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी वाढवून देणे).
महाराष्ट्र ग्राम पंचायत (सुधारणा) अध्यादेश, २०२०, (ग्राम विकास विभाग) (पंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य नसेल त्या ठीकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यासंदर्भातील तरतूद करणे)
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर ( दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२०,  (वित्त विभाग) (केंद्रीय वस्तु व सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुषंगाने,  राज्य अधिनियमामध्ये व केंद्रीय अधिनियम यांमध्ये एकरूपता व प्रयोज्यता राखण्याकरिता सुधारणा करणे).
महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अध्यादेश, २०२०, (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग) (राज्यामध्ये कोरोना कोव्हिड विषाणूच्या सार्वत्रिक महामारीच्या साथीचा प्रसार झाल्यामुळे काही, ठराविक कालावधीत सहकारी संस्थांच्या समित्यांच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने, समित्या यथोचितरित्या घटित होईपर्यंत, सहकारी संस्थांच्या समित्यांच्या विद्यमान सदस्यांना नियमितपणे पदावर राहणे शक्य होण्याच्या आणि अशा समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या दृष्टीने, कलमे ७३अअअ (३) व ७३कब यांमध्ये सुयोग्य सुधारणा करणे)
महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोक-या यांवरील कर (सुधारणा) आध्यादेश, २०२० (वित्त विभाग) (कंपनी अधिनियम २०१३ खाली नविन नोंदणी करतांना व्यवसाय करासाठी नोंणी करण्याबाबत तरतूदी)
महाराष्ट्र आकस्मिकता निधी (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२० (आकस्मीता निधिची मर्यादा तात्पुरती वाढवणे)
महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना (सुधारणा ) अध्यादेश, २०२० (नगर विकास विभाग) (महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६ (१) मधील तिसऱ्या परंतुकातील (ii) च्या तरतूदींमध्ये विकास योजनेचा मसुदा तयार करण्याचा कालावधी महानगरपालिकांबरोबरच इतर नियेाजन प्राधिकरणे यांच्या बाबतीत देखील वाढण्याकरिता सुधारणा करण्यास  तसेच कलम १४८-अे मधील तरतुदीनुसारच्या विहित कालावधीतून, कोवीड-१९ विषाणुच्या संदर्भातील केंद्र शासन तसेच राज्य शासनाने घोषित केलेला टाळेबंदीचा कालावधी वजा करणेबाबत).
प्रस्तावित विधेयके

महाराष्ट्र महानगरपालिकांच्या (राज्यामध्ये कोरोना कोव्हिड विषाणूच्या सार्वत्रिक महामारीच्या साथीचा प्रसार झाल्यामुळे काही महानगरपालिकांच्या महापौरांच्या व उप महापौरांच्या) निवडणुका तात्पुरत्या स्वरुपात पुढे ढकलणे विधेयक,२०२०, (नगर विकास विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. ७ ).
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक, २०२०, (वित्त विभाग), (वस्तू व सेवा कर परिषदेच्या शिफारशीवरुन, दैवी आपत्तीमुळे ज्या कारवाया पूर्ण केल्या जाऊ  शकत नाही किंवा त्यांचे अनुपालन केले जाऊ  शकत नाही अशा करवायांच्या संबंधातील मुदत मर्यादा परिषदेच्या शिफारशींवरून, अधिसूचनेद्वारे वाढविता येईल शासनास अधिकार, अशी तरतुद करणे) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. ८ ).
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२०, (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (नवीन महाविद्यालय तसेच नवीन अभ्यास पाठ्यक्रम इत्यादी सुरू करण्यासाठी मान्यता देण्याकरिता नियत करण्यात आलेला दिनांक, सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी वाढवून देणे) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. ९ ).
महाराष्ट्र ग्राम पंचायत (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२०, (ग्राम विकास विभाग) (पंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य नसेल त्या ठीकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यासंदर्भातील तरतूद करणे) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. १० )
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर ( दुसरी सुधारणा) विधेयक, २०२०,  (वित्त विभाग) (केंद्रीय वस्तु व सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुषंगाने,  राज्य अधिनियमामध्ये व केंद्रीय अधिनियम यांमध्ये एकरूपता व प्रयोज्यता राखण्याकरिता सुधारणा करणे) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. ११ )
महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२०, (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग) (राज्यामध्ये कोरोना कोव्हिड विषाणूच्या सार्वत्रिक महामारीच्या साथीचा प्रसार झाल्यामुळे काही, ठराविक कालावधीत सहकारी संस्थांच्या समित्यांच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने, समित्या यथोचितरित्या घटित होईपर्यंत, सहकारी संस्थांच्या समित्यांच्या विद्यमान सदस्यांना नियमितपणे पदावर राहणे शक्य होण्याच्या आणि अशा समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या दृष्टीने, कलमे ७३अअअ (३) व ७३कब यांमध्ये सुयोग्य सुधारणा करणे) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. १२ ).
महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोकऱ्या यांवरील कर (सुधारणा)  विधेयक, २०२०, (वित्त विभाग), (सन २०२० चा महा. अध्या. क्र. १३ ) (कंपनी अधिनियम २०१३ खाली नविन नोंदणी करतांना व्यवसाय करासाठी नोंणी करण्याबाबत तरतूदी).
महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना (सुधारणा ) विधेयक, २०२०(नगर विकास विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. १५ ) (महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६ (१) मधील तिसऱ्या परंतुकातील (ii) च्या तरतूदींमध्ये विकास योजनेचा मसुदा तयार करण्याचा कालावधी महानगरपालिकांबरोबरच इतर नियेाजन प्राधिकरणे यांच्या बाबतीत देखील वाढण्याकरिता सुधारणा करण्यास  तसेच कलम १४८-अे मधील तरतुदीनुसारच्या विहित कालावधीतून, कोवीड-१९ विषाणुच्या संदर्भातील केंद्र शासन तसेच राज्य शासनाने घोषित केलेला टाळेबंदीचा कालावधी वजा करणेबाबत).
भूमिसंपादन, पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२० (औद्योगीक विकासासाठी भूसंपादन करण्यासाठी सुलभता यावी याकरिता तरतूद) (वन विभाग)
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (सुधारणा) विधेयक, २०२० (विधि व न्याय विभाग) (धर्मादाय आयुक्त कार्यालयातील पूरक संवर्गातील अधीक्षक, जनसंपर्क अधिकारी किंवा विधि सहायक यांच्या पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करण्याकरिता आवश्यक त्या सुधारणा करणेबाबत विधेयक).
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (सुधारणा) विधेयक, 2020 (गृह निर्माण विभाग) (मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भातील तरतूदींबाबत) .
महाराष्ट्र वेश्म मालकी (सुधारणा) विधेयक, २०२०, (गृहनिर्माण विभाग) (वेश्म मालकांच्या बहुमताच्या संमतीने प्रतिज्ञापनाच्या किंवा वेश्म)

 451 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.