गणेशोत्सवात एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील ३० जणांना कोरोनाची लागण

पाँझिटिव्ह रूग्णावर रूग्णालयात उपचार सुरु         

कल्याण : कल्याण पश्चिमेतील जोशी बागेत घरगुती गणपती उत्सवानिमित्त एकत्र आल्याने एकाच कुटुंबातील  ३३ जणापैकी ३० जण कोरोना पाँझिटिव्ह झाल्याने खळबळ उडाली असुन ३३ जणापैकी ३ जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर पाँझिटिव्ह असलेल्या ३० जणावर खाजगी  रूगाणलयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेतील जोशीबाग परिसरात ४ मजली इमारती मधील एकापरिवारातील सुमारे ४० जण दरवर्षी घरगुती गणपतीसाठी एकत्र येतात यंदा देखील गणपती आरती व पुजा निमित्ताने एकत्र आलेल्या परिवारातील ३० जण कोरोना  पॉझिटिव्ह  निघाले असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. २७ आँगस्ट रोजी परिवारातील एकचा कोरोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याने त्यांच्या काँन्टेक मध्ये आलेल्या    परिवारातील गणपती आरती व पुजा निमित्ताने एकत्र येणाऱ्या ३३ जणांची कोरोना चाचणी दरम्यान ३० जणांचे रिपोर्ट पाँझिटिव्ह आले. तर तीन जणांचे कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन च्या नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे.  हे  चित्र ३० जणांच्या कोरोना पाँझिटिव्ह रिपोर्ट मुळे  दिसत आहे. “केडीएमसी साथरोग  अधिकारी डॉ.प्रतिभा पानपाटील यांनी  ३०जणांचे कोरोना चाचणी रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याचे तसेच ३जणांचे कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सांगत पाँझिटिव्ह रूग्णावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले.”

 507 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.