माजी महापौर नईम खान यांनी केली घरवापसी ठाणे: माझी अध्यक्षपदी निवड होताक्षणिक ठाणे महानगरपालिकेतील वेगवेगळ्या पक्षातील विद्यमान नगरसेवकांनी माझे अभिनंदन करीत असताना काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊ इच्छित असल्याची भुमिका माझ्याकडे व्यक्त केली आहे असे धक्कादायक विधान आज ठाणे शहर (जिल्हा)कांग्रेस अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांनी केले.
ठाण्यातील विविध पक्षातील पक्षप्रवेश चालु आहेत आज मुळचे काँग्रेसचेच पण काहीसे काँग्रेसकडून दुर झालेले कळवा-मुंब्रा परिसरातील माजी महापौर नईम खान यांनी आज शहर काँग्रेसचे अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहिलेले वसीम सय्यद व राजकिय विश्लेषक मो.अब्दुल्ला यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला या प्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की,येत्या काही दिवसांतच ठाण्यातील दिग्गज असे विविध पक्षातील पदाधिकारी, नगरसेवक हे काँग्रेस पक्षात प्रवेश घेतील असे भाकित केले तर आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच जागावर आम्ही तयारी करणार असून पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यांनतर नक्की काय सांगू शकेन असे विधान त्यानी एका प्रश्नाचं उत्तर देताना केले.नईम खान यांनी बोलताना सांगितले की,ठाणे काँग्रेसला विक्रांत चव्हाण यांच्या रूपात सक्षम नेतृत्व मिळाले असून त्यांच्या काम करण्याची पद्धतीमूळे आगामी काळात ठाण्यातील काँग्रेस अधिकाधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला.याप्रसंगी ठाणे शहर काँग्रेस सरचिटणीस सचिन शिंदे,भोलेनाथ पाटील,शेखर पाटील, संजय शिंदे,प्रसाद पाटील,मो.झिया शेख,शिरीष घरत आदि पदाधिकारी उपस्थित होते.
474 total views, 1 views today