मनसेचे रस्त्यांच्या खड्यांच्या विरोधात अनोखं आंदोलन

खड्यांच्या मधून लांबउडी स्पर्धा घेऊन नोंदवला निषेध

विजेत्या स्पर्धकांना  विमान , हेलिकॉप्टर देऊन करण्यात आला सन्मान

      नवी मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात घणसोली येथे अनोखं आंदोलन केले , खड्ड्यांच्या मधून  “लांब उडीची” स्पर्धा घेऊन मनसेने आपला निषेध नोंदवला , विजेत्या स्पर्धकांना खेळण्यातील विमान , व हेलिकॉप्टर देऊन गौरविण्यात आले.         
प्रत्येक वर्षी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याकरिता महापालिका करोडो रुपयांचा चुराडा करते , परंतु सर्व सामान्य नवी मुंबईकर जनतेला मात्र खड्डे चुकवत , आपला जीव मुठीत धरतच प्रवास करावा लागत असल्याचे मत मनसेचे संदिप गलुगडे यांनी व्यक्त केले.
येत्या ७ दिवसांत जर रस्त्यांचे खड्डे बुजवण्यात नाही आले , तर मनसे अधिक आक्रमक आंदोलन करेल , सदर प्रसंगी मनसेचे संदीप गलुगडे , सह-सचिव  शरद डीगे , विभाग अध्यक्ष गणेश वाडकर , उपविभाग अध्यक्ष शिवाजी मुंडकर , शाखा अध्यक्ष श्याम वाघमारे , उपशाखा अध्यक्ष प्रणय धरपाळ , रुपेश पवार , अरुण पाटील , तसेच विशाल चव्हाण , अतुल जाधव , विकास चव्हाण ,
उपस्थित होते.

 377 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.