जिल्हा परिषद निधीतून साने येथे रस्त्याचे काॅन्क्रीटीकरण

ठाणे जिल्हा (ग्रामीण) शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद जनसुविधा फंडातून दहा लाख रुपयांचा निधी रस्त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला

                                  
शहापूर (शामकांत पतंगराव) : वासिंद शेजारील जवळच्या साने गावात शिवसेनेच्या प्रयत्नाने गुरुवारी (ता.३) अंतर्गत रस्त्याच्या काॅन्क्रीटकरणाची सुरूवात करण्यात आली. गावातील मुख्य रस्त्यापासून अंगणवाडी कडून स्मशानभूमीकडे जाणा-या या रस्त्यासाठी ठाणे जिल्हा (ग्रामीण) शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद जनसुविधा फंडातून दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे व पंचायत समिती सदस्य सोनल शिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली साने शिवसेना शाखेच्या वतीने या कामाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य, बाळाराम तरणे, विभाग प्रमुख राजदीप जामदार, ग्रामीण संघटक विश्वास पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच काजल तरणे, सदस्य अनंता पाटील, तालुका सह- सचिव अविनाश जाधव, शाखा प्रमुख सचिन भेरे, सचिव संदीप पाटील, निलेश पाटील, अंगणवाडी सेविका कमल पाटील, विलास  पाटील, सदानंद पाटील, अनंता भेरे, दशरथ पाटील, विजय पाटील, भरत पाटील, योगेश पाटील, सागर पाटील, अनिल पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

 405 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.