डोंबिवलीतील भावे सभागृहातील सेतू कार्यालय सुरू करा

वंचित आघाडीचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन

कल्याण :  डोंबिवलीतील भावे सभागृहातील सेतू कार्यालय सुरू करा या मागणीसाठी वंचित आघाडीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.
डोंबिवली शहरात अनेक वर्षापासून कल्याण तहसिल अंतर्गत असणारे भावे सभागृह येथे सेतू सुविधा उपकेंद्र होते. या केंद्रातून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळण्यासाठी लागणारा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, अधिवास दाखला,  त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी आवश्यक लागणारे प्रत्येष्ठ नागरिका प्रमाणपत्र या ठिकानाहून मिळत होते. मात्र ही सेतू सुविधा उपकेंद्र बंद असल्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिक यांना दाखले काढणे साठी कल्याणला जावे लागत आहे. त्यात लोकल रेल्वे वाहतूक बंद आहे त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सेतू केंद्र सुरू करण्याबाबत वंचित आघाडी तर्फे पाठपुरावा करण्यात आला मात्र  कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे कल्याण तहसीलदार कार्यलयासमोर  सेतू सुविधा उपकेंद्र  सुरु करन्याची मागणी करत धरणे आंदोलन करण्यात आले.

 622 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.