संभाजीनगर मधील शिवसेना, भाजप व हिंदुत्ववादी संघटनां मधील मातब्बर नेत्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश
मुंबई : नुकतेच शिवसेनेतून मनसेत आलेले,अनुभवी नेतृत्व व त्वरित संभाजीनगर जिल्ह्याची जबाबदारी मिळालेले
जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या माध्यमातून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत इंनकमिंगला सुरवात झाली आहे.
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना,भाजप व हिंदुत्ववादी संघटनेमधील अनेक मातब्बर मंडळीनी महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये प्रवेश केला.
यामध्ये शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सिडको हडको भागात प्राबल्य असणारे राजू खरे, भाजपाचे माजी नगरसेवक नामदेव बेंद्रे,शिवसेना माजी उपशहर प्रमुख व पतित पावन संघटनेचे अध्यक्ष पै.प्रविण कडपें,जिल्हा संघटक अंकुश क्षीरसागर,कार्याध्यक्ष राजू परळीकर व शिवसेनेचे प्रशांत जोशी,रमेश मोदाणी,अरविंद जाधव यांच्यासह अनेकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला,यावेळी मनसे नेते तथा प्रवक्ते अनिल शिदोरे व अभिजित पानसे यांनी उपस्थिती होती,सर्वांनी भगव्या गांधी टोप्या घालून आज मनसेत प्रवेश केला त्यामुळे मनसेने भगवा झेंडा घेतला व संभाजीनगर मध्ये मनसेला मोठी ताकद यापुढे मिळेल..या प्रवेशाच्या वेळी संदीप कुलकर्णी,राहुल कुलकर्णी व शुभम रगडें हे उपस्थित होते.
673 total views, 1 views today