…अन्यथा आंदोलनाला सामोरे जा





रस्त्यांवरील खडडे बुजवण्यासाठी आ.गणेश नाईक यांचा पालिका प्रशासनाला इशारा

नवी मुंबई : नवी मुंबईतील महत्वाच्या जंक्शनवर मोठया संख्येने खडडे पडले असून ते येत्या सात ते आठ दिवसांत ते बुजविले नाहीत, तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
त्यांनी सोमवारी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. या भेटीत कोरोना विषयक उपाययोजनांचा आढावा घेतला तसेच पावसाळयात पडलेल्या रस्त्यांवरील खडडयांमुळे नागरिक आणि वाहनचालकांना होत असलेल्या प्रचंड त्रासाचा विषय मांडला.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते, एमएमआरडीए आदी प्राधिकरणांच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवर जास्त खडडे पडले आहेत. या प्राधिकरणांशी संपर्क साधून त्यांना हे खडडे तत्परतेने बुजवायला सांगावेत. त्यांनी कार्यवाही नाही केली तर पालिकेनेच हे खडडे बुजवावेत. त्या कामाची बीले या प्राधिकरणांकडे पाठवून द्यावीत असे सांगून जनहितासाठी पालिकेने जर या विषयी हालचाल केली नाही तर मात्र आम्ही आंदोलन पुकारु, असा इशारा नाईक यांनी दिला आहे.
आयुक्तांच्या भेटीसमयी लोकनेते नाईक यांच्यासमवेत माजी खासदार डॉ.संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक,माजी महापौर सागर नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत,माजी महापौर जयवंत सुतार,माजी महापौर सुधाकर सोनावणे,माजी सभापती अनंत सुतार,माजी सभागृहनेते रविंद्र इथापे, माजी विरोधीपक्षनेते दशरथ भगत, माजी सभापती डॉ जयाजी नाथ, माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते,माजी सभापती सुरज पाटील,माजी सभापती गिरीश म्हात्रे,माजी सभापती प्रकाश मोरे, प्रभाग समिती सदस्य विजय साळे आदी मान्यवर उपस्थित होते.
जीवाची बाजी लावून कोविडचे काम करणारे पालिकेचे ठोक मानधनावरील कर्मचारी आणि शिक्षकांना सुरक्षा कवच पुरविण्याची मागणी लोकनेते नाईक यांनी केली होती ती मान्य करण्यात आली आहे. नेरुळच्या डॉ डि वाय पाटील रुग्णालयात आय.सी.सी.यू.आणि व्हेंटिलेटरचे बेड जसे उपलब्ध होतील त्यानुसार वाशीचे पालिका रुग्णालय तेथे हलवून हे रुग्णालय नॉन कोविड करुन सर्व आजारांवर उपचारासाठी खुले होणार आहे. येत्या १० दिवसांत ही प्रक्रीया पूर्ण होईल, असे आयुक्त बांगर यांनी लोकनेते नाईक यांना सांगितले. नवी मुंबईत कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अधिक आहे. प्रत्येक रुग्णाचे प्राण तेवढेच महत्वाचे आहेत. त्यामुळे शुन्य मृत्यूदर आपले ध्येय असले पाहिजे, अशी सुचना लोकनेेते नाईक यांनी केली. पनवेलच्या इंडिया बुल्समधील कोविड सेंटरमध्ये कधी-कधी निकृष्ट दर्जाचे जेवन असते, औषधे उपलब्ध नसतात. सिडको एक्झिबिशन सेंटरमधील कोविड सेंटरमध्ये सी जीवनसत्व गोळयांची कमतरता असते. वैद्यकीय तपासण्या नियमित नसतात. अशा तक्रारी येत आहेत. त्यांची दखल घेवून चांगली सेवा देण्यात सातत्य राखण्याची गरज व्यक्त केली. केवळ खाटा उपलब्ध असणे म्हणजे कोविड सेंटर नव्हे तर त्यामध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असायला हवे, असे नमूद केले. उपलब्ध बेडची संख्या माहित करुन घेण्यासाठी पालिकेने रिअल टाईम डॅशबोर्ड तयार केला आहे मात्र या डॅशबोर्डवरील माहिती आणि प्रत्यक्षात उपलब्ध बेड यामध्ये अनेकवेळा तफावत असते. त्यामुळे वस्तुस्थितीजन्य माहित या डॅशबोर्डवर अपडेट करावी, अशी मागणी केली. वाढीव वीजबीजे जाहिर केल्याप्रमाणे शासनाने माफ केली नाहीत तर आपण राज्याच्या उर्जामंत्रयांबरोबर या विषयी बोलू., अशी माहिती प्रसिध्दी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नांचा उत्तर देताना दिली. लॉकडाउनमुळे नागरिक व उद्योजकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. भिवंडी महापालिकेच्या धर्तीवर नागरिकांसह लघु उद्योजकांना तीन महिन्याचा मालमत्ता आणि पाणीकर माफ करावा, या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला.
जनतेच्या प्रश्‍नांवर अधिकार्‍यांनी हलगर्जीपणा करु नये अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करु. अर्हता नसताना कोविडच्या कामांसाठी काही अधिकार्‍यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेचे नुकसान झाले असेल तर हा विषय विधानसभेत उठवणार असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले.

 366 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.