वाढदिवसानिमित्त गुरख्यांना विजेरी व मास्क वाटप

मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त उपसरपंचानी राबवला उपक्रम

शहापुर : किन्हवली परीसरातील शीळ या गावचे उपसरपंच नितीन ठाकरे व त्यांच्या पत्नी निहारिका यांनी आपल्या ईशान या दोन वर्षांच्या मुलाचा वाढदिवस कोणताही गाजावाजा न करता अनोख्या पध्द्तीने साजरा केला.
रात्री अपरात्री माळरानावर चरण्यासाठी गुरे घेऊन जाणाऱ्या शीळ गावातील सत्तर शेतकरी व गुराखी यांना विजेरी व मास्कचे वाटप केले.वाढदिवसानिमित्त मिळालेल्या या अनपेक्षित भेटवस्तूमुळे शेतकरी व गुराखी यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तरंग उमटले होते

 620 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.