जिल्ह्यात एक हजार २२१ रुग्णांची तर, ३२ जणांचा मृत्यू

गुरुवारप्रमाणे शुक्रवारीही कोरोनाबधितांची संख्या वाढली

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील चार दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असताना, गुरुवारप्रमाणे शुक्रवारीही वाढ झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात एक हजार २२१ रुग्णांसह ३२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या एक लाख २० हजार १३२ तर, मृतांची संख्या आता तीन हजार ४५५ झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील गुरुवारी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ४०८ रुग्णांची तर, ७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या २४ हजार ९९३ तर, मृतांची संख्या ५७१ वर पोहोचली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत २४४ रुग्णांसह ९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या २७ हजार 928 तर, मृतांची संख्या ६०१ वर गेली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत १९७ बाधितांची तर, ६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या २५ हजार २७३ तर, मृतांची संख्या ८१९ वर गेली आहे. मीरा भाईंदरमध्ये १४९ रुग्णांची तर, २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या १२ हजार १९९ तर, मृतांची संख्या ४१८ इतकी झाली आहे. तर, भिवंडी महापालिका क्षेत्रात २७ बधीतांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ४ हजार १५२ तर, मृतांची संख्या २८३ झाली. तसेच उल्हासनगर २० रुग्णांची तर, २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ७ हजार ६८८ तर, मृतांची संख्या २२२ झाली आहे. अंबरनाथमध्ये ५२ रुग्णांची तर, एक जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ४ हजार ८६२ तर,मृतांची संख्या १८२ झाली. तर, बदलापूरमध्ये ३७ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ३ हजार ९८९ तर, मृतांची संख्या ६९ इतकी झाली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात ८७ रुग्णांची तर, ५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ९ हजार ४८ तर, मृतांची संख्या २९० वर गेली आहे.

 557 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.