९७ टक्के गुण मिळवत ठाणे जिल्ह्यात मराठी विषयात मिळवला प्रथम क्रमांक
किन्हवली : किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळाच्या शहा चंदूलाल सरूपचंद विद्यालयातील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी लक्षणा शामकांत पतंगराव हिने मराठी विषयात सर्वाधिक ९७ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम आल्याने शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख व महाराष्ट्र राज्य हातमाग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील,ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे,उपाध्यक्ष सुभाष पवार,मुरबाडचे शिवसेना तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे आदींनी तिची किन्हवली येथे घरी भेट घेऊन सन्मान केला व शुभेच्छा दिल्या.दहावीच्या परीक्षेत तिला एकूण ९३.८० टक्के इतके गुण मिळाले आहेत.ती सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहे.
या अगोदर शहा विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख गोपाळ वेखंडे, किन्हवलीकर क्लासेसचे संचालक संतोष दवणे,किन्हवली ग्रामपंचायत,दयानंद चोरघे संचलीत डी वाय फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष जयकुमार करण आदींनी तिचा गौरव करून शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वतंत्रदिनानिमीत्त किन्हवली येथील शिवाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळेचे ध्वजारोहणही तिच्या हस्ते करण्यात आले होते.
756 total views, 1 views today