यावेळी कोव्हीड योद्धयांचा कऱण्यात आला सन्मान
शहापुर : शहापुर व मुरबाड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या श्री क्षेत्र संगमेश्वर येथील नवनिर्माण फाउंडेशन या व्यसनमुक्ती केंद्रात आज(दि.26)विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या वेळी नव्याने बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे उद्घाटन शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख व महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे,उपाध्यक्ष सुभाष पवार,मुरबाडचे तालुकाप्रमुख कांतीलाल कंठे आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते कोविड योध्यांचा सत्कार करण्यात आला व व्यसनमुक्तीसाठी उपचार घेत असलेल्या केंद्रातील सर्व रुग्ण , कर्मचारी व कोविड योद्धा यांची प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून प्रकाश पाटील यांनी च्यवनप्राश वाटले.
या प्रसंगी संगमगावच्या सरपंच रंजना जाधव,नवनिर्माण फाउंडेशनचे अध्यक्ष केविन पिकार्डो,सहसंचालक राजेश घागस,पत्रकार शामकांत पतंगराव आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन संजय गगे यांनी केले.
561 total views, 2 views today