महाडमधील त्या इमारतीतील ७८ व्यक्ती सुखरूप तर मृतकांची संख्या १० वर

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध सुरु

महाड : येथील तारिक गार्डन कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९७ व्यक्तींपैकी ७८ व्यक्तींना बाहेर काढण्यात आले असून ते सुखरूप आहेत. या दुर्घटनेत संध्याकाळपर्यत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर उर्वरित व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.
स्थानिक चौकशीनुसार इमारतीमध्ये एकूण ४१ सदनिका, १ कार्यालय, १ जिम, १ मोकळा हॉल होता. ए विंग मध्ये एकूण २१ सदनिका होत्या. यामध्ये रहिवास करीत असलेल्या व्यक्तींची संख्या ५४ होती. सुखरूप बाहेर पडलेल्या व्यक्तींची संख्या ४१ असून अद्यापही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींची संख्या १३ आहे. बी विंग मध्ये २० सदनिका होत्या. यामध्ये रहिवास करीत असलेल्या व्यक्तींची संख्या ४३ होती. या दुर्घटनेवेळी सुखरूप बाहेर पडलेल्या व्यक्तींची संख्या ३७ आहे.
इमारत कोसळ्यानंतर एनडीआरएफची पथके रात्री १ वाजून १० मिनिटांनी पोहोचली. त्यानंतर त्वरीत शोधकार्यास सुरुवात. तर घटनास्थळी पोलिस अधिक्षक, अनिल पारसकर, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ, ३ पोलिस उपअधिक्षक, ११ इतर पोलिस अधिकारी तसेच २०० पेक्षा जास्त जास्त पोलिस कर्मचारी आणि एक एसआरपी प्लाटून दुर्घटनास्थळी अत्यंत कमी वेळेत पोहोचून कार्यरत झाली.
दुर्घटनास्थळी बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकांकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ८ व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आले असून त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर सात व्यक्तींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, महाड येथे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ५ व्यक्तींना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

जखमी व्यक्तींचा तपशील पुढीलप्रमाणे: नमिरा शौकत मसुरकर, वय १९ वर्षे, संतोष सहानी, वय २४ वर्ष, फरीदा रियाज पोरे, जयप्रकाश कुमार, वय २४ वर्ष, दिपक कुमार, वय २१ वर्षे, स्वप्निल प्रमोद शिर्के, वय २३ वर्ष, नवीद हमीद दुष्टे, वय ३२ वर्षे.

 मृत व्यक्तींचा तपशील :

१) सय्यद अमित समीर, वय ४५ वर्ष.

2) नविद झमाने, वय ३५ वर्ष

3) नौसिन नदीम बांगी, वय ३० वर्ष

4) आदी हाशिम शैकनग, वय १६ वर्ष

5) अनोळखी स्री चा मृतदेह

6) रोशनबी देशमुख, वय ५६ वर्ष

7) ईस्मत हाशिम शैकनक, वय ४२ वर्ष

8) फातिमा अन्सारी, वय ४० वर्ष

 325 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.