कोरोनामुळे पोलिसांनी गणपती मंडपात जाऊन दिले पारितोषिक

पोलिसांकडून मंडळांना दिले जाणाऱ्या पारितोषकांचा कार्यक्रम रद्द

कल्याण : मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट देशासह राज्यावर आले आहे. त्यातच जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या कल्याण डोंबिवली शहरातील आठ  पोलीस ठाण्याच्या  हद्दीत  असलेल्या सार्वजनिक  गणेशोत्सव  मंडळांना पोलिसांकडून दिले जाणाऱ्या सार्वजनिक पारितोषकांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.  विशेष म्हणजे पारितोषक वितरण सोहळा जरी रद्द केला असला तरीहि गेल्यावर्षी  शांतता व सामाजिक सलोख्यासह  समाज प्रोबधन देखावे उभारणाऱ्या मंडळांना यंदा मंडपात जाऊन पोलिसांनी पारितोषक दिले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत २६५ सार्वजानिक गणेशोत्सव मंडळे असून यापैकी सुमारे ९० मंडळानी यंदाच्या कोरोनाच्या संकटसमयी गणेशोत्सव रद्द केला आहे. तर ठाणे पोलीस आयुक्त (शहर ) अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या  गणेश मंडळांना शांतता व राष्ट्रीय एकात्मता वाढवीच्या दृष्टीने दरवर्षी सर्वच पोलीस परिमंडळामध्ये पारितोषक वितरण सोहळा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येतो. यंदा मात्र कोरोनाच्या महामारीमुळे  सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत परितोषिक सोहळा रद्द करत  गेल्या वर्षी  शांतता व सामाजिक सलोख्यासह  समाज प्रोबधन देखावे  उभारणाऱ्या मंडळांना यंदा मंडपात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांनी पारितोषिक दिले.
आज  कल्याण शहरातील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या  हद्दीत असलेल्या ५ मंडळाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकाचे पारितोषक उत्कर्ष मित्र मंडळ,  रामबाग या मंडळाला दिले. तर दुसरा क्रमांक त्रिगुणा मित्र मंडळ, तिसरा क्रमांक शिवनेरी क्रीडा मंडळ जोशीबाग, चौथा मुरबाग मित्र मंडळ तर पाचवा राष्ट्रीय स्पोर्ट्स क्लब सिंधीगेट, या मंडळाना मिळाला आहे. या स्पर्धेचे परीक्षण रविकुमार ढोमसे, रवींद्र सावंत, हेमंत यादगिरे या परीक्षकांनी केले होते.  या पाचही मंडळाना मुरारबाग मित्र मंडळाच्या मंडपात कल्याण विभागाचे एसीपी अनिल पोवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांच्या हस्ते परितोषिक वितरण करण्यात आले. याचप्रमाणे इतरही पोलीस ठाण्याच्या हद्दीत या पद्धतीने पारितोषिक वितरण सोहळा राबविण्यात येणार असल्याची माहिती  एसीपी अनिल पोवर यांनी दिली आहे.

 466 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.