क्रीडा शिक्षकांना रेशन वाटप संपन्न

बिकट आर्थिक परिस्थिती असणाऱ्या क्रीडा शिक्षकासाठी मागील तीन महिन्यापासून राबवत आहे स्पोर्ट्स हेल्प फाउंडेशन हा उपक्रम

कल्याण : मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील बऱ्याच क्रीडाशिक्षक व प्रशिक्षक यांचे एप्रिल-मे पासूनचे  वेतन बंद झालेल्या अनेक शिक्षकांवर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे अशा क्रीडा शिक्षकांच्या मदतीसाठी  स्पोर्ट्स हेल्प फाऊंडेशन व कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाने मागील तीन महिन्यांपासून अभिनव उपक्रम राबवला आहे.  ज्या सहकारी क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकाची परस्थिती एकदमच बिकट आहे अशा क्रीडा शिक्षकांना
या उपक्रमा अंतर्गत गत तीन महिन्या पासून दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो तूरडाळ, एक किलो तेल, एक किलो मीठ, एक किलो साखर, डाबर च्यवनप्राश, मध, ईम्यूनीटी पॉवर रियल ज्यूस, टूथपेस्ट, हेअर ऑइल, साबण  या महत्त्वाच्या  जीवनावश्य वस्तूचे वाटपकरण्यात येते. यावेळी हे धान्य वाटप २५ ऑगस्ट रोजी माजीआमदार  नरेंद्र पवार याच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी समाजसेवक किशोर मणिलाल, संजय मोरे अध्यक्ष – भाजपा कल्याण (पूर्व)चे अध्यक्ष संजय मोरे, मांडा-टिटवाळा भाजपाध्यक्ष शक्तीवान भोईर, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर,  आरएसपी युनिट प्रमुख मणिलाल शिंपी, उद्योगपती विष्णू सांगळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, भाजपा मुंबई विभागिय  शिक्षक आघाडीचे अध्यक्ष अनिल बोरनारे आदी मान्यवर उपस्थित होते.  या उपक्रमाचे भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सहसचिव नामदेव शिरगावकर व ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे.  तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याणच्या स्पोर्ट्स हेल्प फाउंडेशनचे अविनाश ओंबासे, संतोष पाठक, प्रा.लक्ष्मण इंगळे, प्रा.उदय नाईक, महादेव शिरसागर यांनी परिश्रम घेतले.

 435 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.