कल्याण डोंबिवलीत १०१ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू


२६,९१८ एकूण रुग्ण, तर ५७३ जणांचा आतापर्यंत मृत्यू
तर २४ तासांत १२६ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १०१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून  गेल्या २४ तासांत १२६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या १०१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या  २६,९१८ झाली आहे. यामध्ये ३१२४ रुग्ण उपचार घेत असून २३,२२१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ५७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजच्या १०१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – १३,  कल्याण प.- ३०, डोंबिवली पूर्व २८, डोंबिवली प- १४, मांडा टिटवाळा ५, मोहना ४, तर पिसवली येथील ७ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ५४ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १७ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ५ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ११ रुग्ण हॉलीक्रॉस रुग्णालयातून, ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून, ५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

 472 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.