भातसा धरण भरले ; मुंबई-ठाणेकरांचे पाणीकपातीचे सावट दूर

आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते जलपूजन करून विसर्ग करण्यात आला

शहापूर : ठाणे जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात पुरेशा प्रमाणात पाऊस न पडल्याने धरणांतील पाणीपातळी ५०%पेक्षा कमी होती.यावर्षी पावसाने दडी मारल्याने मुबंई ठाणेकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवले होते,परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीपासूनच धरण परिसरात मोठ्याप्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे.मुबंई ठाणेकरांची तहान भागविणारे शहापूर तालुक्यातील तानसा वैतरणा व भातसा हि तिनही मोठी धरणे भरली आहेत. दरम्यान भातसा धरणाची पाणी पातळी मर्यादित ठेवण्यासाठी तीन दरवाजे ०.२५ मी ने उघडण्यात आले असून ५ल६९क्युमेंक्स (घ.मि./सेकंद) एवढा विसर्ग प्रवाहित करण्यात आला आहे.
शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते जलपूजन करून पाण्याचा विसर्गाला सुरुवात करण्यात आली.यावेळी कार्यकारी अभियंता योगेश पाटील ,शाखा अभियंता शाम हंबिर ,जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय निमसे ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज विशे ,हिरा डहाळे,हरिष दरोडा,दौलत सुरोशे,रोहिदास शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते
भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून या गावातील सरपंच, तलाठी,ग्रामसेवक, यांना गावातील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल याबाबत पाटबंधारे विभागा कडून सूचना करण्यात आली आहे

 365 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.