अस्नोली विकास प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम
शहापुर : सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असलेल्या अस्नोली येथील अस्नोली विकास प्रतिष्ठानने गावातील गुणवंतांचा घरोघरी जाऊन सत्कार केला.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे सार्वजनिक कार्यक्रम न करता इयत्ता पाचवी ते बारावीच्या प्रत्येक इयत्तेतील प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाने व इयत्ता दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या अस्नोली येथील विद्यार्थ्यांना विकास प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यानी शालोपयोगी वस्तु भेट देऊन घरी जाऊन सन्मानित केले.
गणेशोत्सव व त्यात अस्नोली विकास प्रतिष्ठानचा हा सन्मानोत्सव पालकांसाठी गौरवपूर्ण ठरला.या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे शिवाजी दिनकर,कैलास दिनकर,प्रविण सातपुते,दिपक दिनकर, नरेश सातपुते,विष्णु देसले,भगवान दिनकर,ज्ञानेश्वर दिनकर, भगवान सातपुते व अरुण सातपुते हे उपस्थित होते.
496 total views, 1 views today