वंजारी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेची प्रदेश कार्यकारणी जाहिर

भटके विमुक्त अाणि ओबीसी चळवळी मध्ये  वंजारी समाजातील राज्यातील एकमेव सक्रीय संघटना म्हणून सर्वाना परिचित आहे.

कल्याण : राष्ट्रसंत भगवानबाबा व लोकनेते गोपिनाथराव मुंडे साहेब यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने अाणि लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचे सामाजिक नेतृत्व स्विकारुन हि संघटना सामाजिक  क्षेत्रात काम करीत असुन भटक्या विमुक्तांच्या प्रश्नासोबतच ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सक्रीय काम करत अाहे.वंजारी सेवा संघाने आतापर्यंत विविध क्षेत्रात कार्य  केले असुन भटके विमुक्त अाणि ओबीसी चळवळी मध्ये  वंजारी समाजातील राज्यातील एकमेव सक्रीय संघटना म्हणून सर्वाना परिचित आहे. मागील ५ वर्षात फक्त सोशल मिडियावर कार्य न करता अगदी शेवटच्या स्तरापर्यंत संघटनेने मजबूत जाळे तयार केले अाहे. समाजातील बौध्दिक व वैचारिक पातळीवर कार्य करणारी संघटना म्हणुन अाज या संघटनेकडे पाहिले जाते. विविध क्षेत्रात कार्यरत अभ्यासू मंडळी उदा.डाॅक्टर,वकिल,प्राचार्य,प्राध्यापक, अभियंते,शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते, संशोधक,विचारवंत विशेष करुण मोठ्या प्रमाणात शासकिय व निमशासकिय त्यातही सन्माननीय  शिक्षक वर्ग याठिकाणी कार्यरत अाहेत.
समाजामध्ये एक चांगले काम करण्याचा त्यांचा मनोदय अभिनंदनीय आहे.ते भविष्यात समाजामध्ये एक सक्षम युवकांची फळी करण्याचा संकल्प करीत आहेत.अाज प्रदेश अध्यक्ष अनिल फड,कार्याध्यक्ष प्राचार्य डाॅ.खुशाल मुंढे आणि कार्यकारी मंडळाच्या चर्चेनुसार वंजारी सेवा संघ(असोसिएशन) ची प्रदेश कार्यकारिणी घोषीत करित अाहोत.
*वंजारी सेवा संघ(असो.) महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारीणी*
प्रदेशाध्यक्ष : अनिल देविदास फड
प्रदेश कार्याध्यक्ष : प्राचार्य डॉ.खुशाल मुंडे
उपाध्यक्ष : भगवान खेडकर, बाळासाहेब चौधर,प्रशांत नाईक,अभिजित बांगर,बबन बारगजे, अॅड.अमित गिते,कैलास ढाकणे,मिलिंद धात्रक
सरचिटणीस(संघटन) :डाॅ.गणेश अाव्हाड
सरचिटणीस : डाॅ.सुनिल कायंदे, वाल्मिक अांधळे,व्यंकटेश साठे, तुषार पोटे
प्रदेश कोषाध्यक्ष – संघटक : उध्दव ढाकणे
चिटणीस : गोविंद मुंडेसंदिप चकोर, सुनिल कायंदे,अॅड.निवृत्ती कराड,प्राचार्य गजानन कुटे,ज्ञानोबा केंद्रे,रवी घवळे,अतुल बांगर
कार्यालय प्रमुख : रविंद्र जायभाये
प्रसिध्दी प्रमुख : रविकिरण पालवे
वधु-वर सुचक प्रमुख : नामदेव वंजारी
विधी सल्लागार : अॅड.बापु होळंबे पाटील, अॅड.मुरलीधर कराड
महिला प्रदेश अध्यक्षा: मनिषाताई मुंडे-वाघ
महिला प्रदेश कार्याध्यक्ष : मंदाताई फड
युवा प्रदेश अध्यक्ष : तुकाराम नागरगोजे
युवा प्रदेश कार्याध्यक्ष : सोपान चौधर
कार्यकारिणी सदस्य : अभिनय गित्ते,लक्ष्मण थोरवे,जनार्दन तिडके, के.के.सानप,राजेंद्र कांगणे,भगवान बांगर,रवी सिरसाट

 464 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.