ठाणे, दि. ९ (प्रतिनिधी) : ठाण्यातील बेडेकर विद्यालयाच्या मैदानावर १४ जानेवारी रोजी सायंकाळी सोशल मीडियातील सेलिब्रिटींमध्ये क्रिकेट सामने रंगणार आहेत. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे व सामाजिक कार्यकर्ते आदित्य चौहान यांनी ठाणे इन्फ्ल्यूएन्सर लीग- नमो चषक २०२४ स्पर्धेचे आयोजन केले असून, या सामन्यांच्या माध्यमातून सेलिब्रिटींच्या ६ टीमकडून समाजाला संदेश दिला जाणार आहे.
वसंत विहार क्लब हाऊसमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात आमदार निरंजन डावखरे व सेलिब्रिटींच्या हस्ते ठाणे इन्फ्ल्यूएन्सर लीग- नमो चषक २०२४ स्पर्धेतील टीमच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. शरयू कलावंत यांच्या गूड इन्फ्ल्यूएन्स टीमकडून स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागृतीसाठी, दीशा काटकर च्या फ्लेमिंगोज'कडून मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी, जगज्योत सिंग व तन्मय केसवानी यांच्या
हिंगे मेव्हरिक्स’कडून अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी, सौरभ घाडगे यांच्या औरेंज ज्यूस टीमकडून महिला कल्याणासाठी, संघमित्रा पांडे व हेरंभ आचार्य यांच्या सितारे टीमकडून स्वमग्न मुलांसाठी, तर रोशन राय यांच्या थंडर स्ट्राईकर्सकडून वृद्धांना पाठिंबा व्यक्त करण्याचा संदेश देण्यासाठी खेळ खेळला जाईल.
ठाण्यात विविध मुद्द्यांवर सामाजिक जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रथमच सोशल मीडियातील इन्फ्ल्यूएन्सर क्रिकेटच्या मैदानात उतरत आहेत. नौपाड्यातील बेडेकर विद्यामंदिराच्या मैदानाव रठाणे इन्फ्ल्यूएन्सर लीग- नमो चषक २०२४ स्पर्धेच्या होणाऱ्या सामन्यांना १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सुरुवात होणार आहे. तर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सेलिब्रिटींना नमो चषक-२०२४ प्रदान करण्यात येईल.
748,695 total views, 555 views today