ठामपाला मिळाली २० व्हेंटीलेटर्स आणि ३ हजार पीपीई किट

भैय्यासाहेब इंदिसे यांनी पुढाकार घेत दुसऱ्यांदा मिळवून दिले वैद्यकीय साहित्य

ठाणे : ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांच्या नियोजनामुळे ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. मात्र, साधनांच्या कमतरतेमुळे त्यामध्ये अडथळे येऊ नयेत, या उद्देशाने ठामपाच्या स्थायी समितीचे माजी सभापती तथा रिपाइं एकतावादीचे युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी ठामपाला पुन्हा एकदा २० व्हेंटीलेटर्स आणि ३ हजार पीपीई किट उपलब्ध करुन दिले आहेत. कोरोना विशेषज्ज्ञ सेव्हन हिल्स रुग्णालयाचे सहाय्यक वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप पवार यांच्याा उपस्थितीमध्ये ही साधनसामुग्री ठामपा आयुक्त शर्मा यांच्याकडे सुपूर्द करण्यात अआली.
सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. ज्या रुग्णांना हृदयविकार, उच्च रक्तदाब आहे. अशा लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास व्हेंटीलेटर्सची आवश्यकता भासत असते. प्रतिकूल परिस्थितीमध्येही आयुक्त शर्मा यांनी ठाण्यात कोरोनाला अटकाव आणला आहे. मात्र, मात्र, सध्या व्हेंटीलेटर्सचा तुटवडा असल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता असल्याने भैय्यासाहेब इंदिसे यांनी डॉ. दिलीप पवार यांच्या माध्यमातून ठाणे पालिकेला २० व्हेंटीलेटर्स आणि ३ हजार पीपीई किट सुपूर्द केले.
डॉ. पवार यांनी विनंतीला मान देऊन ठाणे पालिकेेला ३ हजार पीपीई किट आणि २० व्हेंटीलेटर्स दिल्याबद्दल भैय्यासाहेब इंदिसे यांनी आभार मानले आहेत. तर, डॉ. विपीन शर्मा यांनी, भैय्यासाहेब इंदिसे यांनी सलग दुसर्‍यांदा ठाणे पालिकेला ही मोठी मदत मिळवून दिलेली असल्याने डॉ. शर्मा यांनी इंदिसे यांचे कौतूक करुन आभार मानले.

130 total views, 1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *