महिलांना कायदेविषयक ज्ञान व इतर प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळावे यासाठी मेळावे, उपक्रम राबणार – रत्नप्रभा तारमळे
शहापूर : ठाणे जिल्ह्यामधील तळागाळातील महिलांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना सक्षमीकरण करण्याबरोबरच ग्रामीण भागातील असलेला कुपोषण रोखण्याकरीता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ठाणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती नवनिर्वाचित सभापती रत्नप्रभा तारमळे यांनी म्हटले आहे.
महिला व मुलींना विविध योजनांच्या माध्यमातून मदत मिळून स्वावलंबी बनता यावे तसेच ग्रामीण भागातील कुपोषित बालक (कमी वजनाची मुलं) व गरोदर माता यांना विविध सकस आहार सेवा मिळावी यासाठी महिला व बालकल्याण विभाग कार्यरत आहे.
जिल्ह्यातील असलेल्या विधवा, घटस्फोटीत , दारीद्रय रेषेखालील महिलांना स्वताःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांना स्वयंरोजगारासाठी असलेल्या योजना तसेच मुलींना मिळणाऱ्या व्यवसायिक तांत्रिक, संगणक प्रशिक्षण मदती बरोबरच इतर नावीन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार त्याचबरोबर गरोदर मातांना मिळणारे अमृत आहार, शाळाबाह्य किशोरवयीन मुलींना घरपोच आहार व ग्रामीण भागातील कुपोषण (कमी वजनाची मुलं) प्रमाण कमी व्हावे या सुधारणेसाठी असलेल्या विविध आहार सेवा याकडे विशेष लक्ष केंद्रित करून जनजागृतीसाठी व महिलांना कायदेविषयक ज्ञान व इतर प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळावे यासाठी मेळावे, उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सभापती रत्नप्रभा तारमळे यांनी सांगितले.
804 total views, 1 views today