अधिसूचना रद्द करण्यासाठी अन्नत्यागाचे अस्त्र

  • महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे आंदोलन सरु ठाणे : शासनाने १० जुलै रोजी अधिसूचना काढून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना मिळणारी पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीचा अधिकार काढून घेतला आहे .ही अधिसूचना रद्द करावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदने आज १० ऑगस्टपासून तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी आंदोलनास सुरुवात केली आहे . संघटनेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यभरातील शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केली आहेआहे.
  • शालेय शिक्षण विभागात सेवे पश्चात मिळणारी पेन्शन कायमस्वरूपी नाकारली  जाणार आहे .पण महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्ती  अधिनियम १९७७ चे कलम ४(१ )कलम १६( २अ )मधील तरतुदीनुसार पूर्वलक्षी प्रभावाने २००५ पासून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची पेन्शन काढून घेता येणार नाही राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य कार्यकारिणीच्या घेण्यात आलेल्या ऑनलाईन  सभेत या सुधारणेचा तीव्र निषेध व्यक्त करून तीन टप्प्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला .त्यानुसार दोन टप्प्यात आंदोलन झाले .
    याबाबत राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेतल्याने शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी, कार्यवाह नरेंद्र वातकर ,यांच्यासह शिक्षक आमदार नागो गाणार, माजी आमदार भगवानराव साळुंखे आदि तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचे नेतृत्व करत असल्याचे शिक्षक परिषदेच्या हेमलता मुनोत यांनी सांगितले.   या आंदोलनात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शिक्षक सहभागी झाले असल्याचे शिक्षक परिषदेचे ठाण्यातील पदाधिकारी हेमलता मुनोत, विजय पाटील, मनीषा चौहान ओम प्रकाश सिंग चौहान, मधुसूदन यादव ,वीरेंद्र सिंग चौहान, गोपाळ हेमाडे ,सतीश घोलप यांनी सांगितले.

 519 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.